आवक वाढल्याने कोथिंबिरचा भाव घटला

पुणे- मार्केट यार्डातील तरकारी विभागात मेथी वगळता पालेभाज्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे कोथिंबीर, चुकाच्या भावात घाऊक बाजारात शेकडा जुडीमागे अनुक्रमे 400 आणि 300 रुपयांनी वाढ झाली आहे. तर, मेथीची आवक निम्म्याने घटली आहे. त्यामुळे मेथीच्या भावात शेकडा जुडीमागे 100 रुपयांनी वाढ झाली आहे. उर्वरित सर्व पालेभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली. मागील आठवड्यात कोथिंबीरीची दीड लाख जुडी आवक झाली. त्यामध्ये वाढ होऊन रविवारी दोन लाख जुडीची आवक झाली. तर मेथीची आवक निम्म्याने घटली आहे. गेल्या आठवड्यात एक लाख जुडी आवक झाली होती. ती कमी होऊन 50 हजार जुडी झाली आहे. कोथिंबिर आणि मेथीला घाऊक बाजारात 300 ते 800 रुपये भाव मिळत आहे. 8 ते 20 रुपये भावाने दोन्ही भाज्यांच्या जुडीची विक्री किरकोळ बाजारात होत असल्याचे भुजबळ यांनी यावेळी सांगितले. पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : 300-800, मेथी : 300-800, शेपू : 400-600, कांदापात : 500-800, चाकवत : 500-600, करडई : 400-500, पुदिना : 200-300, अंबाडी : 400-500, मुळे : 500-800, राजगिरा : 300-500, चुका : 200-500, चवळई : 500-600, पालक : 300-500.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)