आवक वाढल्याने आंबा स्वस्त

पिंपरी – आंब्याचा हंगाम जोरात सुरु झाला असून आंब्याची आवक वाढल्याने आंब्याचे भाव गडगडले आहेत.

सुरुवातीला डझनाने विकले जाणारे आंबे आवक वाढल्याने आता चक्क किलोने विकले जात असून आंबे चाखण्याची हीच नागरिकांना योग्य वेळ असून त्यांनी आंब्याचा जास्तीत जास्त आस्वाद घ्यावा, असे विक्रेते म्हणत आहेत. दहा दिवसापूर्वी 150 ते 200 रुपये किलोने विकले जाणारे आंबे सध्या 70 ते 80 रुपये किलो दराने विकले जात आहेत.

परराज्यातून म्हणजे कर्नाटकातून आंब्याच्या आवकमुळे आणि सर्वत्र आंबे तयार झाल्याने भाव एकदम पडले आहेत, असे विक्रेत्याकडून कळाले. बदाम 60 ते 70 रुपये किलो, हापूस 100 रुपये किलो, कलमी तोतापुरी 100 रुपये दीड किलो, लालबाग 70 रुपये किलो, केशर 80 रुपये किलो असे भाव झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)