आवक वाढली, भाव उतरल्याने गाजर “गोड’

पुणे – राजस्थानातील गोड गाजराचा हंगाम सुरू झाला आहे. गाजर हलव्यासाठी वापरण्यात येणाऱ्या या गाजराची मार्केट यार्डातील तरकारी विभागात मोठी आवक झाली आहे. त्यामुळे गाजराचे भाव उतरले असून, त्याला मिठाई व्यावसायिक आणि गृहिणींकडून मोठी मागणी आहे.

दरवर्षी साधारण नोंव्हेबर, डिसेंबरमध्ये येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये राजस्थानातील गाजरांची आवक सुरू होते. लालचुटूक, पाणीदार गाजर गोडीला देखील चांगले असतात. यामुळे या गाजरांना मागणी अधिक असते. तरकारी विभागात रविवारी सुमारे 10 ते 12 ट्रक राजस्थानी गाजरांची आवक झाली. घाऊक बाजारात 10 किलो गाजरांना 80 ते 110 रुपये असा भाव मिळत आहे. सध्या गाजरांची प्रतवारीदेखील चांगली आहे. थंडी सुरू झाली, की राजस्थानी गाजरांची आवक सुरू होते. हा हंगाम मार्च-एप्रिलपर्यंत सुरू राहतो, अशी माहिती व्यापारी बापू वाडकर यांनी दिली.

गावरान गाजराचे उत्पादन कमी
गावरान गाजरांचे उत्पादन गेल्या काही वर्षांत खूपच कमी झाले असून, केवळ संक्रातीच्या मुहूर्तावर सातारा, पुणे जिल्ह्यांच्या काही भागातून गावरान गाजरांची आवक होते. याशिवाय रंगाने पिवळसर, थोडी तुरट असलेल्या गाजरे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश येथून पुण्यात येतात. ही गाजरे वर्षभर कमी-जास्त प्रमाणात उपलब्ध असतात. परंतु, राजस्थानी गाजरांचा हंगाम थंडीमध्येच असतो. मार्केट यार्डातून गोवा, सांगली, कोल्हापूर, बेळगाव येथे गाजरे पाठविण्यात येतात, असे बापू वाडकर यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)