आवक जास्त झाल्याने फुलांच्या भावात घसरण

पुणे – मार्केट यार्डातील फुल बाजरात फुलांना आवकच्या तुलनेत मागणी कमी आहे. त्यामुळे गुलछडी वगळता सर्व प्रकारच्या फुलांच्या भावात सुमारे 20 ते 30 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. गुलछडीच्या भावात मात्र सुमारे 25 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. आजपासूनच (रविवार) श्रावण महिना सुरू झाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात फुलांना मागणी वाढेल, असा अंदाज व्यापारी सागर भोसले यांनी वर्तविला आहे.
सध्या जिल्ह्यात फुलांच्या उत्पादनासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे बाजारात जास्त माल येत आहे. येत्या काही दिवसातच फुलांच्या किंमती वाढलीत. शेतकऱ्यांना जास्त भाव मिळेल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
फुलांचे प्रतिकिलोचे भाव : झेंडू : 5-20, गुलछडी : 110150, कापरी : 10-20, शेवंती 50-80, ऑस्टर : 15-25, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : 15-25, गुलछडी काडी : 10-40, डच गुलाब (20 नग) : 50-70, लिलिबंडल : 12-18, जर्बेरा : 20-40, कार्नेशियन : 50-100, जुई 200-300.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)