आवक घटल्याने रसाळ फळे वधारली

पपई, द्राक्षे, लिंबाचे भाव वधारले : डाळिंबाच्या भावात घसरण

पुणे- मागणीच्या तुलनेत आवक घटल्याने पपई आणि द्राक्षांच्या भावात वाढ झाली आहे. पपईच्या भावात किलोमगे2 ते 4 रुपयांनी, द्राक्षांच्या भावात सुमारे 10 ते 20 टक्क्‌यांनी वाढ झाली. तर, मागणीअभावी डाळिंबाचे भाव 20 टक्‍क्‍यांनी घसरले आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आंबा, कलिंगड, खरबूज, मोसंबी, संत्री, चिक्कूची आवक कायम असून, भावही स्थिर आहे. दरम्यान, शहरातील सरबत विक्रेते, रसवंतीगृहे यांकडून लिंबाना मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्याने लिंबाचे भाव निम्म्याने वधारले आहे. रविवारी येथील फळबाजारात अननस 6 ट्रक, मोसंबी 60 टन, संत्री 25 टन, डाळींब 30 ते 35 टन, पपई 7 ते 8 टेम्पो, लिंबाची 3 ते 3.5 हजार गोणी, चिक्‍कू दीड हजार डाग, पेरु 50 ते 60 क्रेटस्‌, कलिंगड 40 ते 50 टेम्पो, खरबुज 25 ते 30 टेम्पो, सफरचंद 1 हजार पेटी, आंबा 2 ते अडीच हजार डाग, द्राक्षे 15 ते 16 टन इतकी आवक झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. फळांचे भाव पुढीलप्रमाणे ः लिंबे (प्रति गोणी) : 600-1100, अननस (डझन) : 70-280, मोसंबी : (3 डझन) : 270-400, (4 डझन) : 120-240, संत्रा : ( 3 डझन) 180-400, (4 डझन) : 100-220, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : 30-100, गणेश 10-30, आरक्‍ता 20-40. कलिंगड : 05-1, खरबुज : 10-20, पपई : 5-20, चिक्‍कू : 100-500, पेरू (20 किलो) : 500-600, सफरचंद : सिमला (25 किलो) : 1700-2000, काश्‍मीर डेलीशियस (15 किलो) 1200-1400, किन्नोर : ( 25 किलो) 2000-2500. द्राक्षे : तासगणेश (15 किलो) 550-750, सुपर सोनाका (15 किलो) : 800-1200, शरद (15 किलो) : 1000-1200, सोनाका (15 किलो) : 800-1000, थॉमसन (15 किलो): 500-650, कर्नाटक हापूस (2 डझन) 600-900, पायरी (2 डझन) 700-1000, रत्नागिरी हापूस तयार (4 ते 7) 2000ते 4000, कच्चा (4 ते 7 डझन) 1500-3500.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)