फ्लॉवर, पावटाच्या भावात वाढ, तर काकडीच्या भावात घट

पुणे – सलग दुसऱ्या आठवड्यात मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक कमी झाली आहे. तरीही मागणी असल्यामुळे फ्लॉवर, पावटा आणि काकडी वगळता सर्व फळभाज्यांचे भाव स्थिर आहेत. पावसामुळे फ्लॉवरची आवक घटली आहे. तर, पावट्याचा हंगाम संपला आहे. त्यामुळे दोन्ही फळभाज्यांची आवक घटली असून, भावात सुमारे 10 ते 20 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. तर, आवक वाढल्यामुळे काकडीच्या भावात घट झाली असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.
रविवारी गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात सुमारे 160 ट्रक शेतमालाची आवक झाली. कर्नाटक आणि गुजरात येथून पाच ते सहा ट्रक कोबी, गुजरात, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश येथून 18 ते 20 टेम्पो हिरवी मिरची, बेंगलोर येथून 1 टेम्पो आले, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू येथून 4 ते 5 टेम्पो शेवगा, मध्यप्रदेश इदौर येथून 3 ते 4 टेम्पो गाजर, मध्यप्रदेश आणि गुजरात येथून लसणाची साडेचार ते पाच हजार गोणी इतकी आवक झाली. स्थानिक भागातून सातारी आले 1400 ते 1500 पोती, टॉमेटो चार ते साडेचार हजार पेटी, फ्लॉवर 8 ते 10 टेम्पो, कोबी 14 ते 15 टेम्पो, गवार 4 ते 5 टेम्पो, भेंडी 10 ते 12 टेम्पो, शेवगा 3 ते 4 टेम्पो, ढोबळी मिरची 10 ते 12 टेम्पो, हिरवी मिरची 5 ते 6 टेम्पो, पुरंदर, वाई, पारनेर, सातारा भागातून मटारची 250 ते 300 गोणी, काकडी 7 ते 8 टेम्पो, कारली 7 ते 8 टेम्पो, पावटा 2 ते 3 टेम्पो, भुईमूग 80 ते 100 पोती, कांद्याची 70 ते 80 ट्रक, आग्रा, इंदौर आणि तळेगाव येथून बटाट्याची 60 ते 65 ट्रक इतकी आवक झाली.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : 80-120, बटाटा : 140-170, लसूण : 150-300, आले : सातारी : 450-500, 350-400, भेंडी : 200-300, गवार : 300-400, टोमॅटो : 40-80, दोडका : 200-300, हिरवी मिरची : 250-300, दुधी भोपळा : 70-150, चवळी : 150-200, काकडी : 80-120, कारली : हिरवी 200-250, पांढरी : 180-200, पापडी : 200-200, पडवळ : 140-150, फ्लॉवर : 140-180, कोबी : 30-80, वांगी : 100-200, डिंगरी : 150-200, नवलकोल : 80-100, ढोबळी मिरची : 150-200, तोंडली : कळी 250-300, जाड : 100-120, शेवगा : 200-400, गाजर : 120-160, वालवर : 250-300, बीट : 80-100, घेवडा : 100-200, कोहळा : 100-150, आर्वी : 250-300, घोसावळे : 140-160, ढेमसे : 200-220, भुईमूग : 250-350, पावटा : 200-250, मटार : 400-450, तांबडा भोपळा : 60-100, सुरण : 240-260, मका कणीस : 60-120, नारळ (शेकडा) : 1000-1600.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)