आळे येथे रविवारी मोफत महाआरोग्य मेळावा

आळेफाटा- आळे (ता. जुन्नर) येथे रविवारी (दि. 5) मोफत महाआरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा परिषदचे सदस्य शरद लेंडे व पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे यांनी दिली.
शारदा ग्राम आरोग्य संजीवनी योजने अंतर्गत जिल्हा परिषद व पंचायत समिती जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने येथील ज्ञानेश्वर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यामध्ये विविध आजारांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. तसेच आवश्‍यकता नुसार औषधे ही देण्यात येणार आहेत. शिबिरास येताना पिवळे किंवा केसरी रेशनकार्ड तसेच आधारकार्ड बरोबर घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)