आळे येथे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

आळेफाटा -श्री क्षेत्र आळे (ता. जुन्नर) येथे सोमवारी (दि. 14) भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संयोजक संजू कुऱ्हाडे व पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे यांनी दिली. येथील ज्ञानेश्वर महाराज रेडा समाधी मंदिर येथे ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सायंकाळी 7 ते 8 हरिपाठ, 8 ते 10 भजन व रात्री 10 ते 12 शिवनेर भुषण हभप राजाराम महाराज जाधव यांच्या किर्तनाने व महाप्रसादाच्या कार्यक्रमाने सांगता होणार आहे. या कार्यक्रमांना परिसरातील भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)