आळे केसरीचा मानकरी ठरला अक्षय पवार

आळेफाटा-आळे (ता. जुन्नर) येथील प्रसिद्ध देवस्थान संत ज्ञानेश्वर महाराज रेडा समाधी मंदिर यात्रा उत्सव उत्साहात झाला. या यात्रेत आयोजित केलेल्या कुस्ती आखाड्यामध्ये आळे केसरी मानाची गदा व 10 हजार रूपये रोख बक्षीसाचा बहुमान अहमदनगर येथील अक्षय पवार या मल्लाने पटकावला. अतिशय अनोखा व चांगला प्रयोग यावेळी पै. संजय पाटील भुजबळ, पै. नारसोडे आखाडा विभागाच्या वतीने सर्व मल्लांचं वजन करून त्या-त्या वजनी गटातील कुस्त्या खेळविण्याचे ठरविले. त्यात काही नुरा कुस्त्या करणाऱ्या लबाड मल्लांनी मैदानातून काढता पाय घेतला. खऱ्या अस्सल मल्लांनी खेळ करून दाखविला व कुस्ती शौकिनांनी त्यास भरभरून प्रदिसाद दिला. अतिशय सुरेख असा अस्सल कुस्त्यांचा खेळ पहाण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली.
या प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते अतुल बेनके, जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, आशा बुचके, शिवसेना तालुकाध्यक्ष माऊली खंडागळे, संगीता वाघ, पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे, शाम माळी, अशोक सोनवणे, आनंद रासकर, अतुल भांबेरे, भिमाजी गडगे, चंद्रकांत वाव्हळ, कान्हू पाटील कुऱ्हाडे, कुस्ती शौकीन व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुस्तीगिरांसाठी या ठिकाणी चांगले कुस्ती स्टेडिअम उभारणीसाठी प्रयत्न करणार असल्याचे युवा नेते अतुल बेनके यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)