आळेफाटा स्थानक झाले कचरा डेपो

बोरी -आळेफाटा बस स्थानकाला कचरा डेपोचे स्वरूप आले असून स्थानिक ग्रामस्थांचा व प्रवाशांचा आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची मागणी प्रवाशांकडून व स्थानिक नागरिकांकडून होत आहे. आळेफाटा बसस्थानक आळे व वडगाव आनंद या दोन गावांच्या हद्दीवर आल्याने हे बसस्थानक नेहमीच समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. अनेक दिवसांपासून या बसस्थानकाच्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. ओल्या व सुक्‍या कचऱ्याचा येथे डेपो तयार झाला आहे. सुका कचरा पेटवून दिला जातो.सुक्‍या कचऱ्याबरोबर ओला कचराही जळत असल्याने ओल्या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे अनेक दिवसांपासून स्थानिक नागरिक हैराण झाले असून त्यांचा आरोग्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. यातून अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे. यातून मोठी समस्या निर्माण होण्याची शक्‍यता असल्याने स्थानिक स्वराज्य संस्था व एस.टी. महामंडळाने संयुक्‍त कार्यवाही करून या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून व प्रवाशांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)