आळेफाटा येथे पोलिसांचे रूट मार्च

आळेफाटा- बकरी ईद व गणेश मंडळाच्या होणाऱ्या विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आळेफाटा (ता. जुन्नर) येथे पोलिसांच्या वतीने आज (दि. 29) रूट मार्च( संचलन) करण्यात आले, अशी माहिती आळेफाटा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी दिली. आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी राजुरी आणि बेल्हे या दोन गावांच्या परिसरामधे सायंकाळी 4 ते 5.30 वाजेपर्यंत हे रूट मार्च करण्यात आले. उपविभागिय पोलीस अधिकारी जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक मारूती खेडकर, बेल्हे दुरक्षेत्राच्या श्रीमती डमाले यांच्या नियोजनामधे हे संचलन पार पडले. संचलनासाठी 1 एस. आर. पी. एफ. प्लाटून, मुख्यालयातून दोन आर.सी. पी ट्रायलिंग फोर्स, आळेफाटा, नारायणगाव, ओतूर, जुन्नर पोलीस स्टेशनचे सर्व प्रभारी अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)