आळेफाटा – शासनाने जाहीर केलेला दुधाचा दर सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळावा, या मागणीसाठी जुन्नर तालुक्‍यातील सर्व दूध उत्पादक संस्था व दूध उत्पादक शेतकरी यांच्या वतीने दि. 1 जून रोजी आळेफाटा (ता. जुन्नर) येथे सकाळी 10 वाजता रस्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

कोणत्याही शेतीमालाला हमी बाजारभाव नाही. पशुखाद्य व चारा यांचे वाढलेले दर लक्षात घेता दुधाला किमान 32 ते 35 रूपये दर शासनाने देणे अपेक्षित आहे; परंतु शासनाने गाईच्या दुधाला 27 रूपये दर जाहीर केला म्हणून अनेक शेतकरी दूध व्यवसायाकडे वळाले. सध्या 20 रूपये प्रतिलिटरच्या पुढे कोणताही खासगी खरेदीदार किंवा दूध संघ शेतकऱ्यांना शासनाने ठरवून दिलेला हमी बाजारभाव देत नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी या रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून, या आंदोलनाला दूध उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)