आळेफाटा पोलीस ठाण्याचे सहा. उपनिरीक्षक गाडगे निवृत्त

आळेफाटा- आळेफाटा (ता. जुन्नर) येथे आळेफाटा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पी. एल. गाडगे यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम नुकताच पार पडला. वडगाव आनंद, पादिरवाडी, आळे आणि आळेफाटा परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने येथील संत सावता महाराज मंदिरामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हभप नवनाथ महाराज माशेरे यांनी “पोलीस आणि पोलिसातील माणूस’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी विघ्नहर साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष भीमाजीशेठ गडगे, जिल्हा परिषदेचे गट नेते शरद लेंडे, पोलीस उपनिरीक्षक गणेश उगले, लहूमहाराज शिंदे, कृष्णामहाराज वाळूंज, गजाननमहाराज काळे, गंगारामबुवा डुंबरे, धोंडीभाऊ पानसरे, बाळासाहेब चौगुले, सुरेश चौगुले, आळेफाटा पोलीस स्टेशनचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)