आळेफाटा चौकात वाहनांना “जॅमर’

अवैध पार्किंग केलेल्या 20 हजार वाहनांवर कारवाई

आळेफाटा- आळेफाटा (ता. जुन्नर) चौकात आज (दि. 23) अवैध पार्किंग केलेल्या वाहनांना जॅमर लावत सुमारे 20 वाहनांवर आळेफाटा पोलिसांनी कारवाई करून 4 हजार रुपये दंड वसूल केल्याने अवैध पार्किंग करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक फलके, अरविंद वैद्य, साबासाहेब नाईक, अमित घोगरे या वाहतूक पोलिसांनी हे कारवाई केल्याची माहिती आळेफाटा पोलिसांनी दिली.
आळेफाटा पोलीस ठाण्याची सूत्र हातात घेतल्यानंतर डॅशिंग पोलीस अधिकारी टी. वाय. मुजावर यांनी धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली आहे. आळेफाटा चौक म्हणजे वाहतूक कोंडीचे ठिकाण पुणे-नाशिक आणि कल्याण-अहमदनगर या दोन्ही महामार्गावरचा हा चौक असल्याने येथे नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यातच या चौकामध्ये वाहनांच्या अवैध पार्किंगमुळे वाहतूक कोंडीमध्ये भरच पडत होती. आता या पोलीस अधिकाऱ्याच्या कारवाईमुळे या चौकातील अवैध पार्किंगला आळा बसून, वाहतूक कोंडी सुटण्यास काही प्रमाणात मदत होणार असल्याने स्थानिक ग्रामस्थांनी आणि वाहन चालकांनी या पोलीस अधिकाऱ्याचे अभिनंदन करून समाधान व्यक्त केले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)