आळेफाटा- येथील जे.आर.गुंजाळ इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या विद्यालयाचा बारावीचा निकाल 100 टक्के लागला असल्याची माहिती प्राचार्य ज्ञानेश्वर आरोटे यांनी दिली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी/मार्च 2018 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यात जे.आर.गुंजाळ विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला असून प्रथम तीन क्रमांकामधे आलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत : प्रथम क्रमांक ऋत्विक नानापुरे 82.46 टक्के, द्वितीय क्रमांक मंजू चौधरी 81.23 टक्के तर, तृतीय क्रमांक आयुष्य चोरडिया 79.85 टक्के. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रदीप गुंजाळ, सचिव मीना गुंजाळ, कार्यकारी संचालक अनिल दुरगुडे, प्राचार्य ज्ञानेश्वर आरोटे, संतोष भुजबळ, बाळासाहेब ढोरे, शिक्षक, पालक यांनी अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)