आळेत महाआरोग्य मेळावा उत्साहात

आळेफाटा- आळे (ता.जुन्नर) येथे रविवारी (दि.5) मोफत महाआरोग्य मेळाव्यात एकूण 4 हजार 799 रूग्णांची मोफत आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉउमेश गोडे यांनी दिली.
शारदा ग्राम आरोग्य संजीवनी योजने अंतर्गत जिल्हा परिषद पुणे आणि पंचायत समिती जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि ग्रामपंचायत आळे, रोटरी क्‍लब आळेफाटा, ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ यांच्या सहकार्याने येथील ज्ञानेश्वर हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यत या मेळाव्याचे आयोजन केले होते. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्‌घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे राज्य उपाध्यक्ष अतुल बेनके हे होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, शरद लेंडे, पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे, श्‍याम माळी, सरपंच वर्षा कुऱ्हाडे, उपसरपंच मीननाथ शिंदे, रोटरी क्‍लबचे विमलेश गांधी, संतोष कोठारी, विशाल पाटील भुजबळ, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप बोरा, गटविकास अधिकारी सतिश गाढवे, डॉ.श्‍याम बनकर, डॉरामप्रसाद धायकर, डॉ.आकाश आवारी, डॉ. महादेव वाणी, डॉ. राहुल पावडे, डॉ. पंजाब कथे, डॉ.सचिन शिंदे,बाळासाहेब ढोरे,आरोग्य कर्मचारी व गरजू रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)