आळंदे येथे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात

कापूरहोळ- पंचायत समिती भोर यांच्या वतीने आळंदे (ता. भोर) येथे यशवंतराव चव्हाण कला क्रीडा स्पर्धा महोत्सव अंतर्गत केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्‌घाटन जल्हा परिषदेचे सदस्य विठ्ठल आवाळे यांनी केले. यावेळी आळंदे गावचे सरपंच वनिता नांदे, उपसरपंच राहुल कांबळे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष ज्योती सपकाळ, आळंदे केंद्रप्रमुख सुरेश आवाळे, समवेत विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. यावेळी वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी व संघ यांच्या स्पर्धा बीट स्तरावर घेण्यात येणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)