आळंदे गावाच्या विकासकामांना सुरुवात

जोगवडी- पुणे जिल्हा परिषद पुणेअंतर्गत नसरापू- भोलावडे गणातील आळंदे आणि आळंदेवाडी (ता. भोर) येथे जिल्हा परिषद निधीतून विविध विकासकामांना सुरुवात झाली असून, यावेळी उद्‌घाटन आणि भूमिपूजनप्रसंगी आमदार श्री. संग्राम थोपटे, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे व शैलेश सोनावणे उपस्थित होते.
आळंदे गावामध्ये विविध विकासकामांसाठी जिल्हा परिषदेकडून निधी मंजून झाला असून, त्यामध्ये दलित वस्तीमध्ये हात पंपासाठी 1 लाख रुपये, रस्त्यासाठी 5 लाख, शाळेच्या संरक्षण भिंतीसाठी 6 लाख, शाळा दुरुस्तीसाठी दीड लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. जिल्हा परिषद फंडातून 5 लाख रुपयांचा निधी मुख्य रस्त्यापासून आळंदे गावापर्यंत जोडरस्त्यासाठी उपलब्ध झाला आहे, तर आळंदेवाडी मुख्य जोडणाऱ्या रस्त्यासाठी 35 लाख रुपये मंजूर झाले होते, अशी माहीती रवीनद्र नांदे यांनी दिली. यावेळी संग्राम थोपटे यांनी विकासकामांमध्ये अडथळा होईल असे कोणतेही राजकारण करू नका, असा सल्ला स्थानिकांना दिला. यावेळेस कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य रोहन बाठे, के. डी. सोनवणे, कृष्णाजी शिनगारे, जयश्री शिंदे, नऱ्हेच्या सरपंच रोहिणी गोळे, मनीषा राजीवडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अंकुश खंडाळे, आळंदेच्या सरपंच वनिता नांदे, उपसरपंच राहुल कांबळे, ग्रामपंचायत सदस्य किशोर बांदल, सागर नांदे, यशवंत नांदे, तंटामुक्ती अध्यक्ष संदीप बांदल, ग्रामसेविका दीपाली भोर, आळंदेवाडीच्या सौ. पवार व उपसरपंच धोत्रे उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)