आळंदी रस्त्याच्या मोजणीस बाधित नागरिकांची हरकत

आळंदी- आळंदी नगरपरिषद हद्दीतील पुणे आळंदी रस्ता 45 मीटरऐवजी 35 मीटर प्रमाणे रुंदीकरणाची मागणी बाधित नागरिकांनी लावून धरल्याने प्रलंबित राहिलेल्या विकास कामाचा मार्ग मोकळा झाला होता.मात्र मोजणीस वापरण्यात येत असलेला नकाशा हा विसंगत असल्याने मंजूर डी.पी प्रमाणे मोजणी होत नसल्याने बाधित नागरिकांचे कृती समितीने हरकत घेतली आहे. याबाबतची माहिती आळंदी शहर भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष कृती समिती अध्यक्ष दत्तात्रय काळे,बाधित नागरिक रामदास दाभाडे यांनी दिली.
खेडचे आमदार सुरेश गोरे, पुणे जिल्हाधिकारी सौरव राव, हवेली प्रांत ज्योती कदम, आळंदीचे मुख्याधिकारी सचिन सहस्त्रबुद्धे,मोजणीप्रसंगी हवेलीचे तहसीलदार गीतांजली शिर्के यांना नकाशातील त्रुटीला हरकत घेत असून मोजणीस हरकत असल्याचे सांगितले आहे. विविध विभागात निवेदन हरकत लेखी देण्यात आल्याचे आळंदी पुणे रस्ता नागरी कृती समितीचे अध्यक्ष दत्तात्रय उर्फ बंडू नाना काळे यांनी सांगितले. बैठकीत नकाशावरून ठरले. मात्र, साईटवर विसंगत नकाशालाच हरकत बाधित मिळकत धारकांसमवेत यापूर्वी विश्रामगृहात झालेल्या बैठकीत 35 मीटरप्रमाणे रुंदीकरणास संमती देण्यात आली होती. यावेळी नकाशा हा मंजूर डीपीतील 45 मीटरप्रमाणेच गृहीत धरून दोन्ही बाजूने प्रत्येकी 5 मीटर सोडून 35 मीटरसाठी मार्किंग करण्यास मान्यता देण्यात आली होती, असे काळे यांनी सांगितले.
मात्र, प्रत्यक्ष मार्किंग चुकीच्या व विसंगत नकाशाप्रमाणे सुरु करण्यात आल्याने मोजणीस हरकत घेण्यात आली असल्याचे सांगितले. विसंगत नकाशा तयार केल्याप्रकरणी अधिकऱ्यावर फौंजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी पुणे जिल्हाधिकारी सौरव राव यांच्याकडे करण्यात आल्याचे काळे यांनी सांगितले. या मोजणीबाबत खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी देखील प्रांत हवेली ज्योती कदम यांना नागरिकांचे वतीने कोणावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेण्यास सांगितल्याचे कृती समितीने सांगितले. नागरिकांवर अन्याय होत असेल तर बाधित नागरिकांनी रस्ताचे कामास विरोध करावा, असे आमदार सुरेश गोरे यांनी सांगितल्याचा दावा कृती समितीने केला आहे. मोजणीबाबत पूर्व सूचना वेळ न कळविता मोजणी सकाळी सात ते नऊ या कालावधीत (दि. 19) बाधित नागरिकांना माहिती होऊ न देता घाईत उरकण्यात आल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांना केल्याचे कृती समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. मोजणी नकाशे विसंगत असल्याने नकाशे तयार फेरफारप्रकरणी चौकशी होऊन संबंधित अधिकाऱ्यांवर फौंजदारी दाखल करण्याची मागणी कृती समितीने पुणे प्रशासनाकडे केल्याची माहिती दिली दिली.

  • आमदार सुरेश गोरे, आमदार महेश लांडगे यांची शिष्टाई
    आळंदी विश्रामगृहात आमदार सुरेश गोरे, आमदार महेश लांडगे यांनी सुसंवाद साधून सुवर्णमध्य साधल्याने रस्ते विकासाचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, मार्किंग्च्या पुन्हा रस्ते विकासाला खीळ बसणार असल्याची बाब उघड झाली आहे. उपविभागीय अधिकारी हवेली यांचे वतीने आळंदी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील नवीन एसटी स्टॅन्ड ते माऊलींचे धाकट्या पादुका स्थान या रस्त्याचे रुंदीकरण बाधित मिळकत धारकांसमवेत चर्चा करण्यासाठी बैठक विश्रामगृह आळंदी येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस शिवसेनेचे खेडचे आमदार सुरेश गोरे, भोसरीचे आमदार महेश लांडगे, हवेलीचे तहसीलदार गीतांजली शिर्के,आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर (कांबळे), बांधकाम अभियंता संगपाल गायकवाड, नगरसेवक सचिन गिलबिले, माजी नगरसेवक कांतीशेठ चोरडिया, संतोष चोरडिया, अशोक उमरगेकर, माजी नगरसेविका मंगला वेळकर, सामाजिक कार्यकर्ते रामदास दाभाडे, बंडू दत्तात्रय काळे, मनोज तापकीर, एकनाथ मोरे, मामा पिसाळ, भिकोबा तापकीर, अनंत काळे, चंद्रकांत दाभाडे, अमोल काळे, निवृत्ती काळे, गणेश भिवरे, संदेश तापकीर आदी बाधित नागरिकांसह शासकीय अधिकारी उपस्थित होते.
  • नकाशे विसंगतने फौजदारीची मागणी
    यापूर्वी बाधित नागरिकांनी नियोजित रस्त्याची मोजणी देखील रोखली होती. यामुळे मोजणी प्रक्रिया स्थगित करावी लागली होती. अनेकवेळा रुंदीकरणाचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी बैठकीचे आयोजन देखील करण्यात आले होते. येथील स्थानिक नागरिक,व्यापारी आणि रस्ता रुंदिकारणाने बाधित मिळकतधारक यांनी 45 मीटर रस्ता रुंदीकरणास प्रखर विरोध केला होता.आळंदी नगरपरिषद हद्दीतून 35 मीटर प्रमाणे रस्ता रुंदीकरणास नागरिकांचा विरोध नाही. मात्र, 45 मीटरप्रमाणे रस्ता रुंदीकरणास प्रखर विरोध असल्याचे नागरिकांनी स्पष्ट करून 45 मीटर रस्ता रुंदीकरणाऐवजी 35 मीटरप्रमाणे रस्ते विकासास संमती दिली देखील दिली होती. मात्र, अनेकदा मोजणी केलेले नकाशे आणि मंजूर डी यातील तफावत आणि विसंगत नकाशे यामुळे येथील मोजणीसह रस्ता रुंदीकरणाचा घोळ आणि समस्यां ऐरणीवर आली आहे. रुंदीकरण व्हावे, यासाठी आमदार महेश लांडगे, आमदार सुरेश गोरे यांनी शासकीय अधिकाऱ्यासह नागरिकांशी संवाद साधला होता.
    आमदार लांडगे यांनी यावेळी नागरिकांशी संवाद साधत आळंदी नगरपरिषदेने लोकभावनेचा आदर करीत मागणीप्रमाणे 45 ऐवजी 35 मीटर रस्ता मंजूर विकास आराखड्यात फेरबदलासाठी प्रस्ताव राज्य शासनाकडे तातडीने ठराव करून पाठविण्यास सांगितले.यासाठी आमदार गोरे आणि आपण स्व:त शासन स्तरावर या प्रस्तावाचे मंजुरीसाठी पाठपुरावा करू, अशी ग्वाही आमदार लांडगे यांनी दिली. यावेळी नागरिकांनी टाळ्या वाजवून निर्णयाचे स्वागत केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)