आळंदी यात्रेसाठी पीएमपीच्या 124 जादा बस

पिंपरी – कार्तिकी एकादशी निमित्ताने आळंदी येथे होणाऱ्या संत ज्ञानेश्‍वर महाराज समाधी संजीवन समाधी सोहळ्यासाठी पीएमपी प्रशासनाने जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. आळंदी मार्गावर सध्या असलेल्या 77 पीएमपी बस व जादा 124 बस अश्‍या एकूण 201 बस आळंदी यात्रेसाठी धावणार आहेत.

राज्यभरातून हजारोंच्या संख्येने कार्तिकी एकादशीला आळंदीला येणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी दरवर्षीप्रमाणे जादा बससेवा देण्यात येणार आहे. यासाठी पीएमपी प्रशासनाने नियोजन आराखडा तयार केला आहे. जादा बस 30 नोव्हेंबरपासून ते 6 डिसेंबरपर्यंत धावणार आहेत. तर 2  ते 5 डिसेंबर या 4 दिवसात रात्र सेवा देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आळंदी मार्गावरील मार्ग क्रमांक 264 म.न.पा ते बहूलगाव हा मार्ग यात्रा काळात बंद राहणार आहे. तर मार्ग क्रमांक 257 वाघोली ते आळंदी या मार्गावरील बसेस मरकळ रोड वरील लक्ष्मीमंगल कार्यालय येथून संचलन करणार आहे.

आळंदी यात्रेसाठी पीएमपीएमएलकडून स्वारगेट, हडपसर, पुणे स्टेशन, म.न.पा. भवन, निगडी, पिंपरी, चिंचवड, देहूगाव, भोसरी, रहाटणी आदी ठिकाणावरुन जादा बस सेवा प्रवाशांना मिळणार आहे. दैनंदिन वेळेनंतर पीएमपीच्या रात्रसेवा पुरविणाऱ्या बसेससाठी प्रवाशांना 5 रुपये जादा भाडे मोजावे लागणार आहे. तर रात्री अकरा नंतर सवलतीच्या पासधारकांना पास वापरता येणार नाही, असे पीएमपी प्रशासनाने कळविले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)