आळंदी-बोपखेल बीआरटीएसला मार्च महिन्याचा मुहूर्त?

पिंपरी – आळंदी-पुणे बीआरटी मार्गावर पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील बॅरिकेटस्‌चे काम पूर्ण झाले. बसथांबे व तांत्रिक कामे बाकी आहेत. येत्या मार्चमध्ये हा मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्‍यता बीआरटी सूत्रांनी दिली. पुणे महापालिका हद्दीतील विश्रांतवाडीपासून पुढील सर्व मार्गावरील बस बीआरटी कॉरिडॉरमधून धावत आहेत.

पीएमपीएमएलने आळंदी-पुणे मार्गावर बीआरटी कॉरिडॉर उभारला आहे. आळंदीतून सुटणारी बस पुणे महापालिका हद्दीत विश्रांतवाडीपासून मनपा, स्वारगेट, हडपसर या बीआरटी कॉरिडॉरमधून धावते. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील बीआरटी कॉरिडॉरचे काम पूर्ण नसल्याने केवळ विश्रांतवाडीपासून ही सेवा प्रवाशांना उपलब्ध आहे. दरम्यानच्या काळात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील आळंदी ते बोपखेल या नऊ किलो मीटरचे 60 मीटर रुंदीकरण पूर्ण झाल्यानंतर बीआरटी कॉरिडॉर विकसित करण्यात येणार आहे. सध्या बॅरिकेटस्‌ उभारण्यात आले आहेत. या मार्गावरील दिघीतील केवळ 45 मीटर रस्तारुंदीकरण झाले आहे. याशिवाय रस्ता रुंदीकरणासाठी संरक्षण विभागातील जागा ताब्यात न आल्याने दीड ते दोन किलो मीटर अंतरात बीआरटी नसेल.

महापालिका हद्दीतील काटवेस्ती ते बोपखेल दरम्यानच्या मार्गिकेचे काम पूर्ण करण्याचे काम अंतीम टप्प्यात आहे.
विजय भोजने
प्रवक्ता, बीआरटीएस

अपुऱ्या बससंख्येने अडचण
पीएमपीएमएलच्या ताफ्यात उजव्या बाजूचा दरवाजा असलेल्या बसची संख्या कमी आहे. त्यामुळे काही मार्गांवरील अनेक बस बीआरटी कॉरिडॉरमधून धावत नाहीत. याशिवाय बससंख्या कमी असल्याने हा मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू केला, तरी देखील बससंख्येअभावी किती बस या मार्गातून धावतील, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)