आळंदी बसस्थानकाजवळ गतिरोधक बसवावेत

आळंदी-येथील आळंदी पीएमपीएमएल बसस्थानकाजवळ नवीन व जुना असे दोन पूल असून, आळंदीत प्रवेश करणारा व बाहेर जाणारा एकच प्रमुख मार्ग आहे. दोन्ही बाजुने येणाऱ्या वाहनांची एकच गर्दी या ठिकाणी होते. त्यामुळे येथे गतिरोधक बसवावेत अशी मागणी होत आहे. नगरपरिषदेच्या जुन्या इमारतीकडून कडून बस स्थानकाकडे येणारा रस्ता तीव्र उताराचा असून, याठिकाणी सतत वाहतूक कोंडी तर होतेच शिवाय छोटेमोठे अपघातही या ठिकाणी होताना दिसत आहेत. तीव्र उतार व वळण असल्याने समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नसल्याने अचानक अपघात घडू शकतो. येथे बस स्थानक असल्याने आळंदीकर नागरिक, भाविक व प्रवाशांची सतत वर्दळ सुरू असते तरी याठिकाणी गतिरोधक बसवावेत अशी मागणी नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आजी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)