आळंदी पोटनिवडणूक; शिवसेना-भाजपात सरळ लढत

आळंदी – आळंदी नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीसाठी दोन उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतल्याने निवडणुकीसाठी आता दोन उमेदवार रिंगणात राहिल्याचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले. आळंदी नगरपालिका प्रभाग क्रमांक एक “अ’ साठी शिवसेना आणि भाजपत सरळ लढत होणार असल्याचे अंतिम माघारीने समोर आले आहे. यात अपक्ष उमेदवार शोभा झोंबाडे व योगिता नेटके यांनी उमेदवारी अर्ज माघे घेतल्याचे मुख्याधिकारी भूमकर यांनी सांगितले. प्रभाग क्रमांक एकमध्ये निवडणुकीसाठी भाजपच्या सुनीता रंधवे आणि शिवसेनेच्या सोनू नेटके या उमेदवार आहेत. 6 एप्रिल रोजी मतदान होईल. तर 7 एप्रिल रोजी मतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)