आळंदी पोटनिवडणुकीसाठी तिरंगी लढत?

आळंदी- आळंदी नगरपरिषद पोटनिवडणुकीसाठी यावेळीही शिवसेना-भाजपा युती झाली नाही यामुळे शिवसेना, भाजप, अपक्ष असे तीन उमेदवार रिंगणात असल्याने तिरंगी लढतीने मतदारांचे लक्ष्य वेधले आहे. ऐन लग्नसराईमध्ये प्रभागात दिवाळी साजरी होणार आहे. मागीलवेळी येथुन भाजपने बिनविरोध विजय संपादन केला होता मात्र, यावेळी मतदार मतदान करूनच उमेदवाराला निवडून देण्याच्या तयारीत आहेत. या प्रभागात 1717 मतदार संख्या असून पोटनिवडणूक असल्याने फारसा उत्साह दिसून येत नाही. कमी मतदान झाल्यास याचा फटका कोणाला बसणार यावर आळंदीत चर्चा रंगु लागल्या आहेत. यावेळी मतदार आता पक्षाच्या की अपक्षाच्या पाठीशी उभा राहतो यावर उमेदवाराचे भविष्य ठरणार आहे. सोमवारी (दि. 26) दुपारी तीनपर्यंत अंतिम माघारीची मुदत संपत असून यादिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)