आळंदी पालिका स्वीकृत सदस्यांची पाच मे रोजी निवड

आळंदी-आळंदी नगरपालिकेच्या दोन स्वीकृत सदस्य निवडीसाठी येत्या पाच मे रोजी दुपारी 2 वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी दिली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा पीठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर काम पाहणार आहेत. नगरपालिकेचे स्वीकृत सदस्य दिनेश घुले व सविता राम गावडे यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्याने रिक्त जागांच्या निवडीसाठी ही विशेष सभा घेण्यात येत असल्याचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले. 4 मे रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत नामनिर्देशन अर्ज दाखल करता येतील. वैध प्रस्तावावर 5 मे रोजी दुपारी 2 वाजता सुरू होणाऱ्या विशेष सभेत निर्णय घेण्यात येईल. विशेष सभा तहकूब करता येणार नसल्याने याच सभेत स्वीकृत सदस्यांच्या निवडी होणार आहेत. आळंदी पालिकेत भाजपचे 11, शिवसेनेचे 6 आणि निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत 2 अपेक्ष असे पक्षीय बलाबल आहे. भाजपा व शिवसेना यांच्या गटातून शिफारसपात्र प्रत्येकी एक सदस्य नामनिर्देशित होण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)