आळंदी पालिका कर्मचाऱ्यांचा काम बंदचा इशारा

आळंदी- राज्यातील नव्याने स्थापन झालेल्या नगरपरिषेद व नगरपंचायतीमधील कर्मचारी, कंत्राटी, हंगामी व रोजंदारी कर्मचाऱ्यांचे विनाशर्त, विनाअट समावेश तसेच विविध 23 मागण्यांवर झालेल्या चर्चाप्रमाणे अद्यापपर्यंत शासनाने आदेश दिलेले नाहीत. त्यामुळे येत्या 1 जानेवारी 2019 पासून सर्व नगरपरिषदांमधील कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलन करणार असून मंगळवारी (दि. 18) मंत्रालयावर मोर्चा काढणार असल्याची माहिती कामगार नेते अरुण धुंडरे यांनी दिली आहे. या संदर्भात आळंदी पालिकेचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांना देखील नोटीस देण्यात आली आहे. याप्रसंगी विभाग प्रमुख रामदास भांगे, किशोर तरकासे, भागवत सोमवंशी, कामगार नेते अरुण धुंडरे, दत्तात्रय सोनटक्के, रमेश थोरात, मल्हार बोरगे, मालन पाटोळे आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)