आळंदी परिसरातून चारजण बेपत्ता

आळंदी- आळंदी शहर आणि परिसरातून चार जण वेगवेगळ्या दिवशी बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आल्याचे आळंदी पोलिसांनी सांगितले.
बेपत्ता व्यक्‍ती पुढीलप्रमाणे सोपान बाबुराव तोडगिरे (वय 65 रा. गोपाळपुरा, आळंदी), त्यांचे वर्णनात रंग सावळा, उंची साडेपाच फूट, अंगाने सडपातळ, चेहरा उभट, अंगात पांढऱ्या रंगाचा नेहरु शर्ट, पांढरे धोतर. याप्रकरणी मच्छिंद्र तुकाराम तोडगिरे यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस नाईक एस. बी. क्षीरसागर करीत आहेत.
सारिका चंद्रकांत खंडाईत (वय, 26 रा. गोपाळपुरा, आळंदी) असे बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचे वर्णन पुढीलप्रमाणे रंग गोरा, उंची पाच फूट, केस काळे, दोन्ही कानात रिंग, गुलाबी रंगाची साडी परिधान केलेली आहे. याबाबत निमा उपासे (वय 50, रा. आळंदी) यांनी फिर्याद दिली आहे.
राजेंद्र उर्फ राजू बनकर (वय 54 रा. डुडुळगाव, ता. हवेली) हे आळंदी येथील पीएमपी बसस्थानकातून बेपत्ता झाले आहेत. त्यांचे वर्णन पुढीलप्रमणे; उंची पाच फूट, रंग सावळा, केस काळे, अंगात काळी पॅन्ट, निळसर रंगाचा शर्ट परिधान केलेला आहे.
सागर शामराव राजगुरू (वय 32, रा. चऱ्होली खुर्द, ता. खेड) असे बेपत्ता झालेल्या व्यक्‍तीचे नाव आहे. त्यांचे वर्णन पाच फूट, रंग सावळा, नाक सरळ, अंगामध्ये राखाडी रंगाचा फुल शर्ट व राखाडी रंगाची पॅन्ट परिधान केलेली आहे.
प्रवीण शामराव राजगुरू (वय 29, रा.चऱ्होली खुर्द) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस नाईक नलिनी विरणक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)