आळंदी देवस्थान उंबऱ्याच्या बाहेर पडणार

संग्रहित छायाचित्र....

प्रमुख विश्‍वस्त ऍड. विकास ढगे-पाटील : तीर्थक्षेत्र विकासकामात हातभार लावणार

आळंदी: आजवर आळंदीत येणाऱ्या भाविकांना श्री ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान, आळंदी नगरपरिषद, महाराष्ट्र शासन हे तिनही विभग पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात कमी पडत आहे. त्यामुळे सर्वांनी अंतर्मुख होऊन विचार करणे फार गरजेचे आहे. त्यासाठी यापुढे देवस्थान हे आपल्या उंबऱ्याच्या चाकोरी बाहेर जाऊन तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात सर्व शक्‍तीनिशी झोकून देऊन माऊली मंदिरासह परिसरातील विकासकामास हातभार लावण्यात येईल, अशी ग्वाही देवस्थानांचे प्रमुख विश्‍वस्त ऍड. विकास ढगे-पाटील यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ऍड. विकास ढगे-पाटील यांची पालखी सोहळा प्रमुख पदावरून प्रमुख विश्‍वस्तपदी नुकतीच नियुक्‍ती झाल्याने तसेच विश्‍वस्त डॉ. अभय टिळक, मालक बाळासाहेब आरफळकर, चैतन्य महाराज लोंढे, प्रमुख व्यवस्थापक माऊली वीर व श्रीधर सरनाईक यांचा नगरपरिषदेच्या वतीने माऊली मंदिरात त्यांचा नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, माजी नगरसेवक अशोक कांबळे यांनी सत्कार केला, त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ढगे-पाटील बोलत होते. यावेळी गणपतराव धुंडरे-पाटील, उपाध्यक्ष सागर भोसले, स्वाती पाटील, अभियंता अशोक राजगुरू, ए. बी. कसाब, नगरसेविका सुनिता रंधवे, स्मिता रायकर, खेड तालुका भाजपचे संजय धुंडरे व नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.

ऍड. विकास ढगे-पाटील म्हणाले की, विकासकामांसाठी देवस्थान व नगरपरिषद उभयतांमध्ये सुसवांद होणे गरजेचे आहे.एकमेकांमध्ये समन्वय साधणे, वेळोवेळी बैठका घेऊन नागरिक व भाविकांच्या शंका-समाधानाचे निर्सन करून त्यावर उपाय योजना करणेही तितकेच गरजेचे आहे. तसेच यापुढे देवस्थान भाविकांच्या सुरक्षेसह त्यांना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यास देवस्थांचे सर्व विश्‍वस्त कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)