आळंदी देवस्थानाची गायरान जागा खुली

File photo

आळंदी- तीर्थक्षेत्र आळंदी येथील श्रीसंत ज्ञानेश्‍वर महाराज देवस्थान कमिटीची सुमारे 435 एकर जागा गायरान असल्याने तिच्या वापरावर निर्बंध येत होते; परंतु या जागेवरील आरक्षण शासनाने उठविल्याने आता ती धार्मिक कामांसाठी वापरण्यास हरकत नाही. त्यामुळे शुक्रवार (दि. 30) ते शुक्रवार (दि. 7 डिसेंबर) या कालावधीत अलंकापुरीत संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त येणाऱ्या भाविकांसह, दिंड्यांना, वाहनांसाठी पार्किंगला तसेच तात्पुरत्या निवासासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय देवस्थान कमिटीने घेतला असल्याचे देवस्थांचे प्रमुख विश्‍वस्त ऍड. विकास ढगे पाटील यांनी सांगितले. ही जागा वापरण्या आधी भाविकांसह दिंडीप्रमुखांना मात्र पूर्व परवानगी गरजेची आहे. ही जागा आळंदी येथे डोंगर उतार व पठार मैदानात मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे तीर्थक्षेत्र आळंदीत भाविकांच्या राहण्याची उत्तम सोय होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)