आळंदी देवसस्थानला लाखाची देणगी

तुकाराम माने यांनी समाजापुढे निर्माण केला आदर्श

आळंदी- श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान कमिटीच्या मालकीचे असलेले श्री पद्मावती देवी मातेचे मंदिराचा परिसर विकसित करण्यासाठी देवसस्थानचे पर्यवेक्षक तुकाराम माने यांनी अपार कष्ट घेत प्रकल्प पूर्ण केले. त्यांच्या कष्टाचे नुकतेच चीज झाले असून हे प्रकल्प जनतेसाठी खुलेही करण्यात आले आहे. तर यापुढेही या परिसराचा विकास आणखी व्हावा यासाठी त्यांनी देवसंस्थाला एक लाखाची देणगी देत समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.
तुकाराम कृष्णा माने हे देवसस्थानचे पर्यवेक्षक, अलंकापुरी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष आहेत. त्यांना सामाजिक कार्यातही आवड असल्याने भाविकांसाठी व स्थानिकांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कायमच तत्पर असतात. त्यातच पद्मावती देवी मातेच्या मंदिर परिसराचा विकास करण्याचा ध्यास त्यांनी घेतला. त्यासाठी बाल-गोपाळांसाठी “प्ले पार्क’ माऊलींच्या पुजेसाठी नियमित लागणारी सुगंधी फुलांच्या झाडांची उभारणी करुन तेथील संपूर्ण परिसर विकसित करण्याचा संकल्प सोडला त्यानुसार वरिल दोन्ही प्रकल्प पुर्णत्वास आणले असून प्ले पार्क नागरिकांसाठी खुले ही करण्यात आले. तरी त्यांचे मन त्यांना स्वत बसवत नव्हते त्यांच्यामनात सतत येथे आणखी विकासकामासाठी त्यांची धडपड सुरू होती. मात्र, त्यासाठी निधीची आवश्‍यकता होती म्हणून निधी कसा उभा करणार यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते मात्र, जर आपण स्वत:च निधी देऊ केल्यास काम करण्यास वाव मिळेल या उद्दात हेतून त्यांनी देवसस्थानला एक लाखाची देणगी दिली असून त्याद्वारे ते या मंदिर परिसराचा विकास करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)