आळंदीत कुत्र्यांचा दोघांना चावा

संग्रहित छायाचित्र

आळंदी- आळंदी-मरकळ रस्त्यावर असणारे माऊली पार्क हौसिंग सोसायटीमध्ये गेली अनेक वर्षांपासून मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून आज (सोमवारी) पहाटे एका महिलेसह एका पुरुषास या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. तर जखमी महिलेवर खासगी तर पुरुषावर सरकारी रुग्णालया उपचार सुरू आहेत. मधुबाला लुणावत व पांडुरंग भगत असे कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे आहेत. माऊली पार्क रिसरात मोकाट कुत्र्यांचा मोठा उपद्रव वाढलेला असून रस्त्यावरच झुंडीसह फिरतांना दिसतात, त्यांना हुसकवण्याचा प्रयत्न केल्यास ते सरळ अंगावर येतात, या मोकाट कुत्र्यांची नसबंदी करून त्यांना लांब सोडावे अथवा डॉग व्हॅनद्वारे मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी रहिवासी करीत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)