आळंदीला दर्शन रांग त्याच ठिकाणी : उच्च न्यायालयाचा भाविकांना दिलासा 

File photo

मुंबई: आळंदी येथील मंदिराजवळील ज्ञानेश्‍वर माऊलींच्या समाधी जवळील दर्शनरांग आणि अग्नीशमन दलासाठी राखीव असलेल्या भुखंडावरील आरक्षण उठविले असले तरी कार्तिकी एकादशीला याचा भुखंडावर दर्शन रांगेची व्यवस्था करावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले. हे निर्देश सर्व प्रतिवादींच्या संमत्तीने देतानाच 17 डिसेबरपर्यंत या भुखंडासंदर्भात “जैसे थे’ स्थिती ठेवण्याचे आदेश दिले.

या परिसरात आषाढी आणि कार्तिकी एकादशी दिवशी मोठ्या प्रमाणात भावीक येत असल्याने या भावीकांना दर्शन घेणे सोईस्कर व्हावे म्हणून आळंदी नगरपालीकेने दुसऱ्या विकास आराखड्यात सर्व्हे क्रमांक 127 (7) (ब) चा सुमारे 78 गुठ्यांचा भूखंड दर्शन मंडप आणि अग्नीशमन दलासाठी आरक्षण निश्‍चित केले. त्याला राज्य सरकारने 2013मध्ये मान्यता ही दिली. दरम्यान या भूखंडावरील आरक्षण उठविण्यात यावे, असा थेट अर्ज गुलाबराव महाराज सर्वोदय ट्रस्टचे नारायण मोहोड यांनी 2015 मध्ये मुख्यमंत्र्यांकडे केला. याची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी त्यावर ताताडीने निर्णय घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार नगरविकास खात्याने नगरपालीकेला आरक्षण उठविण्याबाबतचा ठराव करण्याचा आदेश दिला. मात्र, नगरपालीकेने त्यास विरोध दर्शविला.

अखेर नगरविकास खात्याने स्वत:च्या अधिकारात सहाय्यक संचालक पुणे विभाग यांची नियुक्ती करून आरक्षण उठविण्याचा प्रस्ताव तयार करून हरकती आणि सुचना मागविल्या. त्यानंतर जानेवारी 2018 मध्ये भुखंडावरील हे आरक्षण उठविण्याचा निर्णय घेतला. या विरोधात माजी विरोधी पक्षनेते डी. डी. भोसले पाटील आणि एम. डी. भोसले-पाटील यांच्या वतीने ऍड. नितीन देशापांडे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

या याचिकेवर न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्या. रेवती मोहिते-ढेर यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. यावेळी सर्व प्रतिवादीचे वकील न्यायालयात हजर होते. त्याच्या संमतीनंतर यापूर्वी आरक्षीत दर्शन रांगेसाठी भुखंडावर कार्तिकी एकादशी दिवशी येणाऱ्या भाविकांसाठी त्याच ठिकाणी दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात यावी, 21 नोव्हेबर 11 डिसेबरपर्यंत त्या ठिकाणी दर्शन रांगेची व्यवस्था करावी, असे निर्देश न्यायालयाने देऊन याचिकेची सुनावणी 17 डिसेबरपर्यंत तहकूब ठेवली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)