आळंदीला जोणारे तीन रस्ते खडड्ड्यात

आळंदी- उभ्या महाराष्ट्राला तीर्थक्षेत्र म्हणून परिचित असणाऱ्या व पुणे जिल्ह्याच्या कुशीत वसलेल्या अलंकापुरी नगरिस जोडणारे एकूण सहा रस्ते असून त्यापैकी तीन रस्त्यांची अवस्था दयनीय झाल्याने या रस्त्यावरून प्रवास नकोरे बाबा असे प्रवसी म्हणत आहेत.
पुणे-आळंदी हा प्रमुख मार्ग असल्याने याचे दोनशे फुटांचे रुंदीकरण हे काटेवस्ती आळंदी हद्दीपर्यंत पूर्ण झाल्याने काटेवस्ती ते थेट शिवाजीनगरपर्यंत कसलाही अडथळा येत नाही. मात्र काटेवस्ती ते आळंदी या रस्त्याचे 45 मीटरपर्यंतच रुंदीकरण करण्यात न आल्याने व यात शासन व मालमत्ताधारकांत बरेच वादविवाद असल्याने रस्ता रुंदीकरण रखडल्याने सतत होणाऱ्या वाहतूककोंडीने अनेकांना तासन्‌तास रखडावे लागते. पुढे देहुफाटा चौक व वाय जंक्‍शन हे आळंदीत प्रवेश करण्यासाठी दोन महत्त्वाचे टप्पे असूनही चारहीबाजूंनी येणारी-जाणारी वाहने याचठिकाणी एकवटतात त्यामुळे दिवसभराच्या वाहतूककोंडीचा उच्चांक येथुनच सुरू होतो.
आळंदी-देहु रस्ता हा सुमारे 16 किमीचा असून तो आळंदी ते तळवडेपर्यंत रुंदीकरणासह व्यवस्थित आहे, पुढे विठ्ठलवाडी ते देहुगाव या तीन किलो मीटर रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाल्याने वाहनचालकांना कमालीची कसरत करावी लागते. आळंदी- लोणीकंद रस्ता या सुमारे सतरा किलोमीटरच्या रस्त्यावर पावसामुळे ठिकठीकाणी खड्डे पडले आहेत. मरकळ पूल ओलांडताच हवेली हद्दीत चढावर गेली अनेक वर्षांपासून याठिकाणी खड्ड्यांचा सामना येणाऱ्या-जाणाऱ्यास करावा लागत आहे. या रस्त्यावर खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी निधी दिला असून देखील तो वापराल जात नसल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. तसेच आळंदी-चाकण रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले असून, याच मार्गे जड-अवजड वाहने नगर महामार्गावरुन आळंदीमार्गे चाकण-तळेगाव दाभाडे येथुन मुंबईकडे जात असल्याने काही ठिकाणी रस्त्याची चाळण झाली आहे.
आळंदी-वडगाव-घेनंदचे कॉंक्रिटीकरण निकृष्ट
आळंदी- वडगांव-घेनंद रस्ता हा आळंदीच्या विश्रांतीवडापासून तर शेलपिंपळगाव फाटा येथपर्यंत पूर्णपणे उखडलेला आहे. सुमारे एक ते दीड किलोमीटर रस्त्यावर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून रस्त्याचे सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्यात आले मात्र, अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने या रस्त्यावर अनेक ठिकाणी भेगा पडल्या असून रस्त्याचे रुंदीकरण न करता केवळ पदपथच मोठे करुन ठेवले आहेत.

  • केळगाव-चिंबळी रस्ता रुंदीकरण्याचा सर्व्हे सुरू
    आळंदीव्हाया केळगाव-चिंबळी या सुमारे सहा किमी रस्त्याचे रुंदीकरण रखडले असून गेल्या अनेक वर्षांपासून यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहेत. तसेच केळगाव, आसारामबापू आश्रम व चिंबळी हद्दीत दोन असे मिळून एकूण चार ठिकाणी साकव पुलाची गरज आहे. सध्या याच्या रुंदीकरणाचा सर्व्हे सुरू असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)