आळंदीत 70 जणांची नेत्र तपासणी

आळंदी- ससून सर्वोपचार रुग्णालय (पुणे), पुणे वारकरी सेवा संघ, अलंकापुरी प्रतिष्ठान व समता फाउंडेशन (मुंबई) यांच्या संयुक्‍त विद्यमाने आज (शुक्रवारी) इंदिरा एकादशीचे औचित साधत मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 10 ते 2 या वेळेत सुमारे 70 जणांची तपासणी करण्यात आली. दरम्यान, त्यात 18 जणांना मोतीबिंदू आढळून आले. मोतीबिंदू झालेल्या रुग्णांना ससून येथे मोफत शस्त्रक्रिया, राहण्याची, जेवणाची व काळ्या चष्म्याची मोफत सोय करण्यात येणार असल्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले. ही मोफत नेत्र तपासणी सेवाही दर महिन्याच्या एकादशीला राबविली जाणार असल्याचे अलंकापुरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण येळवंडे यांनी सांगितले. यावेळी डॉ. वैभव कणसे, डॉ. दिव्या ठकरारी, डॉ. शालू चव्हाण, ऍड. माधवी निगडे, राजाभाऊ चोपदार, दीपक पाटील, शंकर येळवंडे, विठ्ठल बोचरे, नाना काळे, शामराव गिलबिले, ज्ञानेश्‍वर रायकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)