आळंदीत 31 वर्षांनी आठवणींना उजाळा

आळंदी-तब्बल 31 वर्षांनी एस मॅडम… एस सर.. उपस्थित बाई..-हजर गुरूजी.. असे म्हणत व राष्ट्रगीताने सुरूवात करीत श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील सन 1987 -88च्या दहावीच्या बॅचने जुन्या आठवणींना उजाळा दिला.
गुरूवारी येथील विठ्ठल कृपा सभागृहात सुमारे 45 विद्यार्थ्यांनी व 15 गुरूजन वर्गास एकत्रित करून एक अनोखा मेळावा घडवून आणला. “बाई आमची भाजी भाकरी जरा खाऊंन बघा ना’ अशी बतावणी करीत एकमेकांशी दीर्घकाळ संवाद साधून जुन्या आठवणींना उजाळा देत या माजी विद्यार्थ्यांनी एक आनंद सोहळाच साजरा केला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 31 वर्षानंतरची ही आपल्या माजी विद्यार्थ्यांची आर्त हाक ऐकून शिक्षक वर्गही काही काळ गहिवरला. या कालावधीत जे विद्यार्थी/ शिक्षक व इतर घटकातील मंडळी आपल्यातून निघून गेली त्यांना प्रथम क्षणभर स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण केली. तद्‌नंतर गुरूजन वर्गाचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृती चिन्ह व एक रोपटे भेट देऊन सन्मान करण्यात आला.
शालेय जीवनातुन बाहेर पडल्यानंतरच्या प्रौढ अवस्थेतील विचारांची देवाण – घेवाण करून, आपुलकीचे, जिव्हाळ्याच्या मैत्रीचे नाते अखंड जपून तेवत ठेवण्यासाठी ऍड. नाझिम शेख, संभाजी धुंडरे, रविंद्र शिर्के, आनंद रणदिवे, अभय टांकसाळे, राजाभाऊ चोपदार, अविनाश बोरूंदिया व राजेंद्र आंबीरकर आदी माजी विद्यार्थी पुढे सरसावले व 18 मार्च रोजी बैठक घेण्यात आली. या धगधगीच्या व धावपळीच्या जगात शसोशल मीडियाचा आधार घेत तब्बल 45 विद्यार्थ्यांना तसेच गुरूजन वर्गास संपर्क करून लगेचच गुरूवारी (दि. 22) मेळावा घडवून आणला.
यावेळी गुरूजन वर्गामध्ये जे. के. शिर्के, जे. बी. काळे, आर. एन. चव्हाण, हमीद शेख, पी. व्ही. पंडित, बी. बी. फडके, हेमलता शेवडे, एस. एस. शेडबाळकर, ललीता आन्द्रे, सुमन संगपाळ, एस. व्ही. पारख तर माजी विद्यार्थ्यांमध्ये जनार्दन धुंडरे, महेश बोरूंदिया, दशरथ हरे, महादेव पाखरे, पोपट लोखंडे, चंद्रकांत शेडगे, सुनिल तापकीर, बाळासाहेब भोसले, जनार्दन वहिले, सुरेश कांबळे, सुनिल उंद्रे, किसन कात्रजकर, संतोष लोणकर, रविंद्र थोरवे, जितेंद्र वडगांवकर, श्रीकांत शेळके, सुभाष बोऱ्हाडे, दत्तात्रय धुंडरे, जितेंद्र बागमार, यज्ञेश कुलकर्णी, भरत इंगळे, बंकट घरत, योगीराज कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर पवार, जितु चोरडिया, राजेश धुंडरे, ज्ञानेश्वर मुंगसे, भाग्यश्री उगले, श्रद्धा कचरे, श्रद्धा बुचके, विद्या तापकीर, अनिता श्‍याम हत्तेकर, अश्विनी रेणके, सुजाता सातकर, अरूणा बोरूंदिया, शुभांगी तापकीर, देशमुख मॅंडम आदींसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विचारांची देवाण – घेवाण झाली. सर्वच गुरूवर्यांनी आपल्या आई – वडिलांना अखेरपर्यंत अंतर देऊ नका, त्यांना वृद्धाश्रमाची वाट दाखवू नका, असे सांगितले. तर विद्यार्थिनींना देखील आपले सासु- सासरे यांना आई-वडिलांचा मान देत त्यांना अंतर देऊ नका असा मोलाचा सल्ला दिला. पसायदान होऊन सर्वांनी भोजनाचा आनंद घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)