आळंदीत सामाजिक, धार्मिक, पौराणिक व हलत्या देखाव्यांवर भर

आळंदी-तीर्थक्षेत्र आळंदीत विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व बहुतेक घराघरांत अतिशय मेहनतीने सजावटीची कामे करून, शहर व परिसरातील मंडळांनी देखील सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक, पौराणिक व हलते देखावे सादर करुन गणेश भक्तांना गणेशाची विविध रूपे पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
येथील आळंदी- मोशी रस्त्यावर राहुल चव्हाण हे गेली अनेक वर्षे विविध राज्यांतील पर्यटन स्थळे, धार्मिक ठिकाणे ऐतिहासिक व पौराणिक देखावे स्वत: सादर करून एक अनोखा देखावा आपल्या घरी दरवर्षी सादर करतात. प्रतिवर्षीचे त्यांचे देखाव्याचे सादरीकरण हे वैशिष्ट्यपूर्ण असल्याने मित्र-मंडळी, सगे-सोयरे व जवळपास राहणारे आवर्जून यांच्या घरी खास सजावट आकर्षक देखावा पाहण्यासाठी गर्दी करतात. यंदाच्या गणेशोत्सवात आळंदीसह परिसरातील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक व पौराणिक देखावे सादरीकरणावर भर दिल्याचे चित्र सर्वत्र पाहवयास मिळत आहे. राहुल चव्हाण यांनी यंदा दीड महिना अथक परिश्रम घेऊन गोकर्ण महाबळेश्वर कर्नाटक हा सुंदर, मनमोहक असा देखावा सादर केल्याने तो पाहण्यासाठी परिसरातील गणेशभक्‍त देखील गर्दी करू लागले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)