आळंदीत “सर्वांसाठी घरे’ लाभार्थी ताटकळले

आळंदी- पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्वांसाठी घरे 2022 अंतर्गत गेली महिनाभरापासून लाभार्थ्यांना आळंदी नगरपालिकेमार्फत झोपडपट्टी पुनर्वसनास प्राधान्यक्रम देत ही योजना राबविण्यात येत आहे. मात्र, लाभार्थ्यांना सखोल माहिती मिळत नसल्याने त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. अत्यावश्‍यक ती मुळ कागदपत्रां ऐवजी इतर पुरावे व जी कागदपत्रे शासनाच्या जीआरनुसार देण्यात येत असूनही नोटरीकडून ऍफिडेव्हिट करून आणण्यास सांगितले जात असल्याने लाभार्थी मेटाकुटीस आले आहेत. दरम्यान, अर्ज दाखल करण्यचा आज (मंगळवार) अखेरचा दिवस होता यामुळे लाभार्थ्यांची संख्या लक्षणीय होती. त्यामुळे कामधंदा सोडुन आठ ते दहा तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागल्याने अनेकांनी नाराजी व्यक्‍त करीत मुदत वाढ मिळण्याची मागणी केली.
आळंदी नगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका स्मिता रायकर यांनी या योजनेच्या मुदत वाढीची मागणी केली आहे. दरम्यान, या योजनेसाठी20 रूपयात प्रतिज्ञापत्रे नागरी सुविधा केंद्रात मिळावीत, अशी मागणी केली. तर खासगी नोटरीकडून लाभार्थ्यांकडून 500 ते1000 रुपये उकळले जातात, त्यामुळे लाभार्थ्यांना नाहक भुर्दड सहन करावा लागत असल्याने “चार आण्याची कोंबडी अन्‌ बाराण्याचा मसाला’ या म्हणी प्रमाणे लाभार्थ्यांची गळचेपी होत असल्याची कडवट प्रतिक्रिया ही शेतकरी बचाव आंदोलन संघटनेचे. संस्थापक अध्यक्ष गजानन गांडेकर यांनी व्यक्‍त केली.

  • लाभार्थ्यांनी अत्यावश्‍यक तीच कागदपत्रे जोडुन देवी. तसेच 2011 नंतरचीच सर्व कागदपत्रे ग्राह्य धरावीत व ही योजना प्रभाविपणे यशस्वीरित्या राबवावीत.
    सागर भोसले, उपनराध्यक्ष, आळंदी नगरापालिका

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
24 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
12 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)