आळंदीत वीणा, टाळ-मृदंग तालाची चाचणी

मागणी वाढली : कार्तिकी एकादशिनिमित्त कारागिरांचे हात मग्न

एम. डी. पाखरे

-Ads-

आळंदी- यात्रा काळासह इतर प्रसंगी वारकऱ्यांकडून भजन-कीर्तनासाठी वारकरी सांप्रदायिक साहित्याची मागणी यात विणा, टाळ-मृदंगाची मागणी सातत्याने वाढल्यामुळे आळंदी शहरातील कारागिरांचे हात वाद्य बनविण्यात देखील रंगले आहेत. वाद्यांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या भाववाढीमुळे तसेच गेल्या दोन वर्षांपासून लागू झालेल्या जीएसटी कर प्रणालीमुळे वारकऱ्यांना लागणाऱ्या टाळ-मृदंग, वीणा आदी सांप्रदायिक साहित्याच्या किमतीत 20 ते 25 टक्‍क्‍यांनी वाढले असल्याचे वाद्यांचे निर्माते तुकाराम नेटके यांनी सांगितले.
कार्तिकी वारीसाठी देहू-आळंदीसह राज्यातून आळंदी वारीस येणाऱ्या भाविक वारकऱ्यांच्या खांद्यावर भगवी पताका, हातात टाळ, हरिनाम गजर आणि साथीला मृदंगाच्या आवाजाची वैभवी जोड हे दृश्‍य पाहत कार्तिकीचे वारीचा आनंद सोहळा अनेक जण अनुभवतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून विविध संतांच्या दिंड्या आळंदीकडे निघालेल्या सर्वत्र पाण्यास मिळत आहे. वारीला टाळ, वीणा आणि मृदंगाचा त्रिवेणी संगम पाहण्यास मिळणार असल्याने प्रत्येक दिंडीत हे ठरलेलेच असते. त्यातही मृदंग मुख्य असतो. यात्रा काळात शेकडो ठिकाणी एकाचवेळी हरिनाम सप्ताहासाठी तसेच तीर्थक्षेत्रात वर्षभर मृदंगांना मागणी असते. आषाढीसह कार्तिकी वारीच्या काळात दरवर्षी मागणीत वाढ होते मात्र, यंदा अवघ्या काही दिवसांवर वारी येऊन ठेपली असूनही हवी तशी मागणी नसल्याचे नेटके यांनी सांगितले.
आळंदीत वर्षभर मृदंग बनविण्याचे काम सुरू असते. आळंदीतील आषाढी तसेच कार्तिकी यात्रेच्या काळात मृदंगांची मागणी वाढते. आतापर्यंत अनेक मृदंगांची विक्री झाली आहे. कार्तिकी वारीत तर मागणीत आणखी वाढ होईल. आळंदीत बाराही महिने मृदंग बनविण्याचे काम सुरू असते, नवीन कामे आणि जुन्या कामांच्या देखभाल दुरुस्तीची कामे आळंदीत सध्या आळंदीत सर्वत्र सुरु आहेत. दरम्यान, राज्यात तसेच आळंदीत मृदंग बनविणारे जे कारागीर आहेत ते बरेच येथूनच शिकले असल्याचे वाडेकर यांनी सांगितले. दिवसभरात दोन ते तीन मृदंग बनविले जातात. कारागिरांना मिळणारा मोबदला गेल्या काही वर्षांच्या तुलनेत वाढला असला, तरी महागाईने कमीच पडत असल्याचे त्यांनी सांगितले.

  • मृदंगास 2500 रुपयांपर्यंत रेंज
    मृदंगाच्या किमती सध्या 2500 रुपयांपासून 6 हजार रुपयांपर्यंत आहेत. खैर, शिसम, सागवान, बिबला झाडाचे लाकूड आता स्टीलचे ही तयार होत असल्यामुळे मृदंग किमतीने जास्त असतात. तर आंबा, कडुनिंबाच्या लाकडापासून बनविलेल्या मृदंगाच्या किमती त्या मानाने कमी असतात. मृदंगासाठी लागणारे लाकूड दिल्ली परिसरातून येत असते. कातडे सोलापूरहून तर आवाजासाठी आवश्‍यमक असणारी शाई आणि खळ ही गुजरात राज्यातून येते. सध्या कच्या मालाच्या किमती वाढल्यामुळे यंदा मृदंगाच्या किमती वाढल्या आहेत. मात्र, दर्जेदार मृदंग निर्मिती असल्याने भाविक, वारकरी देखील याचा विचार करीत नाही असा आमचा अनुभव असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
  • वाद्यांच्या किमती
    टाळ : 300 ते 700
    मृदंग : 2500 ते 6 हजार
    वीणा : 2000 ते 5 हजार
    हार्मोनियम 5000 ते 20 हजार
    तबला : 3000 ते 10 हजार
  • तीर्थक्षेत्र आळंदीत कार्तिकीनिमित्त वारकरी सांप्रदायिक साहित्याचे देखभाल दुरुस्ती आणि नवीन साहित्याची जमवाजमव सुरू करण्यात आली आहे. शहरातील टाळ, मृदंग, वीणा, तबला, हार्मोनियम आदी केंद्रात देखील साहित्याचा साठा आणि देखभाल दुरुस्तीचे कामनांनी वेग घेतला आहे. दोन वर्षांपासून लागू झालेल्या जीएसटीमुळे या साहित्यांच्या किंमतीत 20 ते 25 टक्‍क्‍यांनी वाढल्य आहेत.
    – तुकाराम नेटके, ज्ञानसागर तबला, पखवाज मेकर्स, मालक-कारागीर

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)