आळंदीत लोहार समाजाचा गुणगौरव सोहळा

आळंदी- लोहार युथ फाऊंडेशन पुणे जिल्हाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा 2018 हा उत्साहात हजारो लोहार समाज बांधवांच्या उपस्थितीत आळंदीत पार पडला. यावेळी आळंदीच्या नगरध्यक्षा वैजयंता उमरगेकर, नगरसेविका सुनिता रंधवे, लोहार युथ फाउंडेशनच्या राज्य अध्यक्षा दिपाली विघवे, उपाध्यक्षा शीतल खंडागळे, सचिव नितेश लोखंडे, खजिनदार सुशील विघे व मान्यवरांच्या उपस्थितीत दिप प्रज्वलन, विश्वकर्मा पुजनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी राज्यातील ज्येष्ठ लोहार समाज कार्यकर्ते,लोहार युथ फाऊंडेशनचे कार्यकर्ते हे उपस्थित होते. याप्रसंगी लोहार युथ फाउंडेशन पुणे जिल्ह्याच्या वतीने जिल्ह्यातील विविध क्षेत्रात आदर्श काम करणाऱ्या व्यक्तींना विविध क्षेत्रातील पुरस्कार पिंपरी चिंचवड मनपाचे महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे, आळंदीच्या नगरध्यक्षा वैजयंता उमरगेकर, नगरसेविका सुनीता रंधवे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यामध्ये आदर्श पुरस्कार पुढीलप्रमाणे; खेलरत्न : रोहित चव्हाण (कोरियातील भालाफेकमध्ये सूवर्णपदक), समाजरत्न : स्व. बन्सीसाहेब गाडेकर, शिक्षणश्री : शांताराम थोरात गुरुजी, उद्योगश्री : शरद थोरात, समाजभूषण : संदिप थोरात, पोपटराव पवार, निवृत्ती पोपळघट, पारुबाई लोहार, मायमाऊली : नलिनी लोखंडे, सुरेखा साळवणकर, वैशाली कळसाईत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)