आळंदीत रंगले विज्ञानाचे मनोरंजक प्रयोग

आळंदी- येथील श्री ज्ञानेश्‍वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान विभागाअंतर्गत धमाल विज्ञानाची-विज्ञानाचे मनोरंजक प्रयोग हा कार्यक्रम कराड येथील कल्पना चावला विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. संजय पुजारी व त्यांच्या टीमने सादर केला. याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्‌घाटन संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगांवकर, व प्रशालेचे पर्यवेक्षक सिद्धनाथ चव्हाण, दीपक मुंगसे, सूर्यकांत मुंगसे, शशिकला वाघमारे, अनिता गावडे, अनुराधा खेसे, पूजा चौधरी आदी उपस्थित होते. कल्पना चावला विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. संजय पुजारी यांनी धमाल विज्ञानाची-विज्ञानाचे मनोरंजक प्रयोग हसत-खेळत, नाचत-गात विज्ञानाच्या मूलभूत संकल्पना अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविल्या. यामध्ये त्यांनी वस्तुमान, वजन, गुरुत्वाकर्षण शक्‍ती कशी तयार होते, आदी संकल्पना स्पष्ट केल्या. त्यासाठी त्यांनी विविध उदाहरणे दिली. पर्यावरण रक्षणासाठी पपेट शो, जादूचे प्रयोग, धम्माल गाणी मनत मुलांचा सहभाग घेतला. या कार्यक्रमात पुजारी सरांबरोबर चिन्मय जगधनी, कुणाल बव्हेकर आणि प्रमोद अंगारखे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकला वाघमारे तर आभार सूर्यकांत खुडे यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)