आळंदीत रंगला फॅशन इव्हेंट

आळंदी- येथील राज म्युझिक अँड डान्स क्‍लासेस आयोजित फॅशन इव्हेंट अँड डान्स स्पर्धेत कलाकारांसह गुणवंत स्पर्धेकांनी सहभाग घेतला होता अशी माहिती संचालक राजेश आवळे यांनी दिली. स्पर्धकांनी आपल्यातील सुप्त कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. त्याचबरोबर क्‍लासचे प्रशिक्षक अमोल जाधव यांनी देखील आपल्या नृत्याने प्रेक्षकांना मोहित केले. यावेळी आळंदी नगरपालिकेचे उपाध्यक्ष सचिन गिलबिले, नगरसेवक सागर बोरुंदिया, प्रशांत कुऱ्हाडे, सचिन पाचुंदे, संचालक राजेश आवळे, गोविंद जाधव, हरिष आवळे, स्वीटी गोसावी, महेंद्र पगडे, पायल बाविस्कर व अंजली उपाध्ये आदी उपस्थित होते. विजेत्या स्पर्धकांमध्ये शौर्या यादव, आशिर्वाद जोगदंड, यश घेनंद, सोनाली आवळे, गौरी डफळ, त्रिशा दौंडकर, कौस्तुभ पाचुंदे, अल्पना घेनंद, निष्ठा चपणे, साहिल पगडे, रविशा पाचुंदे व सावनी भगत यांचा समावेश आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)