आळंदीत महामंडाळाचे राज्यस्तरीय अधिवेशन

संग्रहित छायाचित्र....

आळंदी- संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर माउलींच्या आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये शनिवारी (दि. 22) व रविवारी (दि. 23) महामंडळाचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे. तब्बल 23 वर्षांनंतर पुणे जिल्ह्यात हे अधिवेशन होणार आहे. महाराष्ट्र राज्यातील शिक्षण संस्था स्तरावरील समस्या वाढत असल्याने त्यांच्या सोडवणुकीसाठी या अधिवेशनात चर्चा होणार आहे. यानिमित्ताने खेड तालुक्‍यातील शैक्षणिक संस्थांचा त्यात सहभाग असावा या दृष्टिकोनातून विचार विनिमय करण्यासाठी बुधवारी (दि. 12) राजगुरूनगर येथील महात्मा गांधी विद्यालयात संस्थाचालकांच्या सभेचे आयोजन केले होते. या सभेसाठी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे पुणे विभागाचे प्रमुख गणपतराव बालवडकर, महामंडळाचे राज्य कार्यकारिणी सदस्य अजित वडगावकर यांनी मार्गदर्शन केले. यात संस्था चालकांच्या व शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांवर चर्चा झाली.प्रशालांमध्ये सध्या रिक्‍त असलेलेली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे विनाविलंब भरली जावी, संस्था ज्या भागातील आहे तिथे त्या भागातील उमेदवारांना भरतीमध्ये प्राधान्य मिळावे, किमान उच्च माध्यमिकस्तरापर्यंतच्या सर्व शाळांसाठी विनाअनुदानित पद्धत सरसकट बंद करावी, पवित्र प्रणाली या विषयांवर आपण अधिवेशनात चर्चा घडवून आणू अशी ग्वाही सावंत यांनी दिली. सभेसाठी मोहन शितोळे यांनी सहकार्य केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)