आळंदीत डॉ. आंबेडकर यांना अभिवादन

आळंदी- संविधान प्रस्ताविक वाचन, सामूहिक बुद्धवंदना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण अशा विविध कार्यक्रमांद्वारे महपरिनिर्वाणदिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. आळंदी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे पार पडलेल्या याकार्यक्रमाप्रसंगी संजय गायकवाड, संदीप रंधवे, बाळासाहेब खरात, राहूल रंधवे, सचिन खिल्लारे, तुषार रंधवे, संतोष डोळस, मारुती विधाटे, सोनाजी कामिटे, राहूल डुमणे, विष्णू इंगोले, प्रशांत पडघान, परी इंगोले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सामूहिक बुद्धवंदना, त्रिशरण व पंचशील घेण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन करत, भारत देश बलशाली होण्यासाठी योगदान देण्याची शपथ घेतली. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे आळंदी शहर उपाध्यक्ष बाळासाहेब खरात यांनी आंबेडकरांचे विचार अंमलात आणण्याचे आवाहन केले. तर संस्थेच्या मालकीच्या दहा गुंठे जागेवर भव्य वास्तू उभारण्यासाठी संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या संपर्कात असल्याची माहिती शहराध्यक्ष संदीप रंधवे यांनी यावेळी दिली. होते. भारतीय बौद्ध महासभेच्या आळंदी शहराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहूल रंधवे, सूत्रसंचालन सचिन खिल्लारे, तर विष्णू इंगोले यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)