आळंदी- तीर्थक्षेत्र आळंदीला विविध कारणांनी अन्यन्यसाधारण महत्त्व प्राप्त होऊ लागले आहे, त्यामुळेच येथे जमिनींचे भाव आकाशाला भिडले आहेत. माउली मंदिर परिसरातील फुटभर जागेला तर सोन्याचा भाव आला असून, अतिक्रमणांचा जणू येथे बाजारच भरलेला दिसतो आहे. त्यामुळे “माउलींच्या नगरीत होते अतिक्रमणांची दाटी…; कोणाचीच कशी येत नाही आडकाठी…!’ असे म्हणण्याची वेळ आळंदीकरांवर आली आहे.
येथील माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील यांनी आळंदीसह परिसरात होणाऱ्या अतिक्रमणांवर टीकास्त्र सोडले असून, अतिक्रमणमुक्त आळंदीसाठी त्यांचा लढा असाच पुढे चालू राहणार असल्याने त्यांनी थेट पिंपरी-चिंचवड आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे धाव घेतली आहे.
अतिक्रमणाविषयी पहिला मुद्दा मांडताना वाय-जंक्‍शन देहुफाटा (चौक), योगिराज चौक, पुणे-आळंदी रस्ता काटे वस्ती हद्दीपर्यंत त्याचप्रमाणे मोशी रस्त्यावर आळंदी नगरपालिकेच्या हद्दीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली अतिक्रमणे पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात त्वरित काढून घ्यावीत, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
त्यांनी या परिसरात कोणी कोणी अतिक्रमणे केली आहेत, ती त्यांच्या नावानिशी नमुद केले आहे.
त्याचप्रमाणे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील 25 टक्के नागरिकांना स्मशानभूमीची सुविधा नसल्याने आळंदीच्या स्मशानभूमीचाच वापर केला जातो, तरी महापालिकेने पलीकडील हद्दीसाठी स्मशानभूमीची सोय करण्यात यावी, अशीही मागणी डी. डी. भोसले यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)