आळंदीत अखंडीत सेवा द्या

आळंदी- आळंदीकर गेल्या दोन महिन्यांपासून डेंग्यू व डेंग्यू सदृस्य आजारांने ग्रास्तले आहे. तरी याचा याचा प्रादुर्भाव वारी काळात होऊ नये, चेंगराचेंगरीसारख्या दुर्घटना होऊ नयेत यासाठी पोलीस, पालिका व महसूल विभागाने एकत्रितपणे नियोजन करून वारकऱ्यांना सेवा-सुविधा पुरवित 6 जुलै रोजी होणारी वारी सुरूळीतपणे पार पाडावी. तसेच 2 जुलै ते 7 जुलैपर्यंत सर्व शासकीय कार्यालयांनी अखंडीत सेवा पार पाडावी तर पालिकेत मध्यवर्ती आपत्कालीन कक्ष स्थापन करावे, असा आदेश खेडचे प्रांताधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला आहे.
माऊलींच्या पालखीचे 6 जुलओ रोजी आळंदीतून पंढरीकडे प्रस्थान होणार आहे. त्यासंदर्भात बुधवारी (दि. 13) सायंकाळी आळंदी नगरपरिषद सभागृहात वारीच्या नियोजनाकरीता प्रांताधिकारचेआयुष प्रसाद यांच्या अध्यक्षेतेखाली विविध शासकीय अधिकाऱ्यांची बैठक झाली, त्यावेळी त्यांनी वरील आदेश सर्व विभागांना दिले आहेत. याप्रसंगी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष सागर भोसले, पोलीस उपविभागीय अधिकारी राम पठारे, आळंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, मुख्याधिकारी समीर भुमकर आदींसह नगरसेवक-नगरसेविका व विविध खात्यांचे अधिकारी व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आयुष प्रसाद म्हणाले की, वारीकाळात मुख्य प्रस्थानच्या दिवशी मंदिरात वारकऱ्यांच्या, स्थानिक ग्रामस्थ आणि निमंत्रित लोकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी देवस्थानने मंदिर प्रवेशाचे पास देणे कमी करावे. त्याचप्रमाणे बोगस पासची निर्मिती होऊ नये व काळाबाजार करून पास विक्री होऊ नये यासाठी पासवर क्रमांक असावेत. मंदिर प्रवेश पास वाटप शनिवार (दि. 30) पर्यंत करावेत. सर्व शासकीय खात्यांच्या समन्वयासाठी आपत्कालीन कक्ष पालिकेत स्थापन करून शासकीय कार्यालयांनी दुरध्वनी सुरू करावेत.
शहरातील रसत्यास अडथळा ठरणारे विजेचे खांब त्वरित काढुन टाकावेत. याशिवाय 24 तास रूग्णसेवेसाठी कर्मचारी असतील याची खात्री करून त्याची माहिती आपत्कालीन कक्षास वेळोवेळी कळवावी. टॅंकरने पाणी पुरविण्यासाठी पाण्याचे स्रोत जाहीर करून गळके टॅंकर वापरू नयेत. संशयास्पद व्यक्‍ती अथवा व्यक्‍तींची माहिती नजिकच्या पोलिसांना देण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी राम पठारे यांनी केले.

 • बैठकीतील ठळक मुद्दे
  गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी पोलीस पाटलांची नेमणूक करणे
  शुक्रवार (दि.15) पासून अतिक्रमण हटाव मोहीम
  यात्राकाळात 550 मोबाईल शौचालयांची उभारणी करणार
  200 प्रखर विद्युत झोताचे दिवे लावणार
  चार हजार लिटर रॉकेलचा साठा व गॅस उपलब्ध करणार
  पीएमपीएमएलच्या 100 बसेस व एसटीच्या 32 बसेस कार्यरत राहणार
  3 जुलै पासून अत्यावश्‍यक सेवा पुरविणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका आणि वेळेचे बंधन
  वारकऱ्यांच्या दिंडीची वाहने, दूध, फळे, भाजीपाला व इतर अत्यावश्‍यक असणाऱ्या व जे पासधारक आहेत अशांनाच यात्रा काळात आळंदी शहरात प्रवेश

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)