आळंदीतून दारू, मटका, जुगार हद्दपार करा

अवैध व्यवसायावर करडी नजर ठेवा – प्रांताधिकारी आयुष प्रसाद यांचे पोलिसांना आदेश

आळंदी- आळंदी शहरातील अपुर्ण असलेले रस्ते व चौक, शौचालये, पोलिसांना राहणे व भोजनाकरीता जागा देणे. यात्रा काळात पदपथावर एकही अतिक्रमण होऊ न देणे, दारू, मटका, जुगार व लॉज आदी अवैध व्यवसायांवर 24 तास पोलिसांनी करडी नजर ठेवावी, तसेच यात्रा काळात दारू, मटका, जुगार हद्दपार करुन लॉजेसची तपासणी करण्याचे आदेश सहाय्यक जिल्हाधिकारी तथा खेडचे प्रांत आयुष प्रसाद यांनी दिले.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराज 723 वा संजीवन समाधी सोहळा शुक्रवार (दि. 30) ते शुक्रवार (दि. 7) या कालावधीत पार पडणार आहे. त्यामुळे या सोहळ्याच्या कामाच्या आढावा घेण्यासाठी आज (मंगळवारी) आळंदी नगरपरिषदेच्या सभागृहात प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली, त्यावेळी प्रसाद यांनी वरील आदेश दिले आहेत. याप्रसंगी तहसीलदार सुचित्रा आमले, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपाध्यक्ष सचिन गिलबिले, सहायक पोलीस आयुक्‍त रामचंद्र अलसटवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र चौधर, देवस्थाचे प्रमुख विश्‍वस्त ऍड. विकास ढगे-पाटील, नगरसेवक-नगरसेविका, व सर्व खात्यांचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.
संजीवन समाधी सोहळ्या संदर्भात जे-जे संबंधित खाती आहेत (शासकीय, निमशासकीय व इतर) या सर्वांची शुक्रवारी (दि. 16) तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या नियोजन बैठकीत अधिकारी, पदाधिकारी आदींना आजच्या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. यात आळंदी नगरपरिद, महसूल, श्री ज्ञानेश्‍वर महाराज देवस्थान (आळंदी), आळंदी देवाची, दिघी पोलीस ठाणे, पीएमपी, एसटी महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वीज वितरण, आळंदी ग्रामीण रुग्णालय, अन्न व भेसळ औषध प्रशासन विभाग, टेलीफोन आदी खात्यांनी पाच दिवसांत केलेल्या कामांचा व उर्वरित करावयाची कामे या संदर्भात सूचना व झालेल्या कामाचा आढावा यावेळी प्रसाद यांनी घेतला. तर प्रत्येक खात्यांनी यात्रा काळात भाविकांना दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधांवर साधक बाधक अशी सखोल चर्चा करण्यात आली. अनेक खात्यांनी आपापल्या अडचणी व पूर्ण करावयाच्या कामांची ग्वाही यावेळी दिली. तर सोमवार (दि. 26) पर्यंत प्रलंबित सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश प्रसाद यांनी संबंधितांना दिले. तर राज्य परिसरातून येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयी सुविधांसाठी प्रत्येक खात्यांनी सजग राहून त्यांची यात्राकाळात कोणतीही गैरसोय होणार नसल्याची ग्वाही सर्वांनीच दिली.

 • दर्शनबारीत जिल्हाधिकारी घालणार लक्ष
  आळंदीतील दर्शनबारीचे आरक्षण उठविल्या कारणाने एक जनहित याचिका दाखल केली होती. सध्या हे प्रकरण जरी न्यायप्रविष्ठ असले तरी यंदाची वारी पूर्ण करण्यासाठी तरी दर्शन बारीसाठी जागा खुली करुन देण्यात यावी, अशी मागणी सर्व स्तरातून जोर धरत होती. त्यावर आयुष्य प्रसाद यांनी सांगितले की, ही बाब जिल्हाधिकारी त्यांच्या स्तरावर सोडविणार आहेत.त्यासाठी सोमवारी (दि. 26) जिल्हाधिकारी कार्यालयात एका खास बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावर पोलीस प्रशासन व आळंदी देवस्थांने सांगितले की, त्वरित निर्णय द्या कारण ती दर्शन बारी तयार करण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी लागतो, पोलीस प्रशासनानेही सांगितले की, योग्य बंदोबस्ताचे नियोजन देखिल पाच दिवस अगोदरच करावे लागते, असे सांगितल्याने आता प्रशासन काय निर्णय घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
 • बैठकीतील ठळक मुद्दे
  यात्रा काळात ब्लॅक मार्केटिंग पूर्णपणे बंद करणे
  पार्किंगचे नियोजन हे आळंदी नगरपरिषद व पोलीस प्रशासनाने करावयाचे आहे.
  अतिक्रमणे सकाळी आठ वाजल्यापासूनच काढण्यास सुरुवात करावी.
  अत्यावश्‍यक सेवेतून अतिक्रमण वगळण्यात यावे
  शौचालयासाठी भाविकांडून एक रुपया देखिल घेऊ नये
  भाविकांना सर्व सुविधा त्या-त्या खात्यांनी सुरूळीतपणे पुरवाव्यात

-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)