आळंदीतील शिवतेज मित्र मंडळ

आळंदी- येथील महाद्वार रस्त्यावरील सुमारे 40 वर्षांपूर्वी स्थापन झालेले शिवतेज मित्र मंडळ हे नेहमीच सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, कला-क्रीडा क्षेत्रात अग्रणी असून, गणेशोत्सवाबरोबरच वर्षभर निरनिराळे सामाजिक उपक्रम राबवित आहे. या मंडळाचे खास वैशिष्ट्य असे की, गेल्या 30 वर्षांपासून एकमेव अध्यक्ष म्हणून आळंदी नगरपालिकेचे माजी नगरसेवक आनंदराव मुंगसे हे कार्यभार सांभाळीत आहेत.
यंदाचा गणेशोत्सव सुरू होऊन पाच दिवस झाले. मंडळाच्या अध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून एक अनोखा उपक्रम यावेळी सुरू करण्याचे ठरविले असून, गणेशोत्सव काळात नियमित होणाऱ्या गणरायाच्या आरतीसाठी समाजातील अगदी तळागाळातील व्यक्ती शोधून प्रथम आरतीचा मान त्यांना द्यावा, ही संकल्पना अमलात आणली आहे. त्यानुसार सोमवारी (दि. 28) आळंदी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागात कचरा वाहून नेणाऱ्या वाहनावर गेली 40 वर्षे चालक म्हणून काम करणारे आणि आजवर नागरिकांचे आरोग्य आबाधित ठेवणारे माउली जाधव आणि आळंदीच्या जडणघडणीत पत्रकारितेच्या माध्यमातून गेली 30 वर्षे नागरिकांच्या विविध समस्यांवर भाष्य करून त्या सोडवण्यासाठी काम करणारे महादेव पाखरे यांना मंडळाच्या श्रीगणेशाच्या आरतीचा मान देण्यात आला. त्याचबरोबर श्रींच्या आरतीचा मान दिलेल्या मान्यवर व्यक्तींना रोपटे भेट देऊन पर्यावरणाचा एक प्रकारे संदेश मंडळ देत आहे.
या उपक्रमानुसार सर्वसामान्य कामगार, वकील, डॉक्‍टर, इंजिनिअर, अधिकारी, पत्रकार, कलाकार, व्यापारी, वंचित मुले, पालिका अधिकारी आदी क्षेत्रातील मंडळींना यंदापासून आरतीचा मान देण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष आनंदराव मुंगसे यांनी सांगितले. यंदाच्या वर्षी राज्यात झालेल्या शेतकयऱ्याच्या अनेक आत्महत्या, जीएसटी लागू झालेली कर प्रणाली हे चित्र डोळ्यासमोर ठेवून अतिशय साधेपणे यंदाचा गणेशोत्सव साजरा करीत असल्याचे मुंगसे यांनी सांगितले. आमचे मंडळ खऱ्या अर्थाने सर्वधर्मसमभाव जपणारे मंडळ आहे, असे अध्यक्ष आनंदराव मुंगसे यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)