आळंदीतील शाळांसाठी शिक्षणमंत्र्यांना साकडे

आळंदी- आळंदी येथील नगरपालिकेच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीचा वर्ग व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या, अशी मागणी आळंदी जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र धुंडरे यांनी मुंबई येथे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे केली आहे. येथील मुक्तादेवी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ग्यानज्योत इंग्लिश मीडियम स्कूलच्यावतीने विनोद तावडे यांना श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज यांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला, त्यावेळी धुंडरे यांनी ही मागणी केली. राजेंद्र धुंडरे म्हणाले की, आळंदी नगरपरिषद शाळांमध्ये आर. टी. ई. शासन आदेशानुसार वातावरण निर्माती, खेळाचे मैदान आदी सुविधा बाबतचे निवेदन पुणे जिल्हा परिषद, प्राथमिक शिक्षणाधिकारी, आयुक्त, संचालक, सचिव यांना देण्यात आल्याचे धुंडरे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)