आळंदीतील रुंदीकरणाचा मार्ग मोकळा

आळंदी- तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार प्रदक्षिणा रस्ता रूंदीकरणात आळंदी पालिकेने केलेली रस्त्याची आखणी तत्वत: बरोबर आहे. चाकण चौक येथील मुख्य चौकात असणारी सारडा धर्मशाळा (ट्रस्ट) यांनी दाखल केलेल्या याचिकेचा निकाल पालिकेच्या बाजुने लागला असल्याने पालिकेला रूंदीकरणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले.
आळंदीतील रस्ता रूंदीरणाची कामे सहा महिन्यापूर्वीच हाती घेण्यात आले असून, यातील 70 टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावा पालिकेच्या वतीने करण्यात आला आहे. तर 30 टक्के कामे ही रूंदीकरणात जाणाऱ्या बांधकामधारकांनी न्यायालयात याचिका दाखल केल्याने प्रलंबित राहिली होती.
सारडा ट्रस्टने विकास आराखड्यात रस्ता रूंदीकरणाची रचना एकाच बाजुने करीत विरूद्ध बाजुच्या बांधकामांना अभय दिल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याबाबत त्यांनी पालिकेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.तिची सुनावणी सोमवारी (दि. 9) झाली. याबाबत पालिकेच्या बाजुने निकाल देण्यात आला.
मुख्याधिकारी समीर भूमकर म्हणाले की, उच्च न्यायालयाच्या निकालानुसार संबंधित ट्रस्टला बांधकाम स्वत:हून हटविण्याबाबत विनंती केली जाईल. या निकालामुळे प्रदक्षिणा मार्गाचे इतर दाखल खटले देखील लवकरच मार्गी लागुन तीही वाट मोकळी होईल, एकूण 1100 मीटर काम असून, त्यापैकी 800 मीटर काम पूर्ण झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)