आळंदीतील रस्ते चिखलमय; अनेक दुचाकीस्वार जखमी

आळंदी- अलंकापुरीतील प्रदक्षिणा मार्गावर सिमेंट कॉंक्रिटीकरण झाले खरे मात्र, काही ठिकाणी पदपथाची कामे अर्धवट असल्याने रस्त्याच्या खालची माती सिमेंटच्या रस्त्यावर येत असल्याने शहरातील सर्व रस्ते चिखलमय झाले आहे. त्यातच रिमझिम पडणाऱ्या पावसामुळे रस्ते अतिशय घसरडे, निसरडे व चिखलमय झाल्याने यावरुन दुचाकीस्वार घसरून पडल्याने अनेकांना दुखापती झाल्या आहेत. गेल्या आठवड्यात प्रायोगिक तत्त्वावर एक दिवस पालिकेने रस्ते धुण्याचे प्रात्यक्षिक केले; परंतु काही वेळेतच परिस्थिती पुन्हा “जैसे थे’ झाल्याने पालिकेची रस्ते धुण्याची योजनाही फोल ठरली. दरम्यापन, आज सकाळी 8 ते 10 या कालावधीत जुन्या नगरपरिषदेसमोर अनेक दुचाकीस्वार घसरून पडले असल्याचे प्रत्यक्षदर्शिनीं सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)